माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.आपणांस विविध शैक्षणिक माहिती देण्याचा माझा प्रयत्न आपणांस नक्की आवडेल. आपल्या प्रतिक्रिया नक्की दया...धन्यवाद.. कोरोनावर मात करूया.घरी रहा सुरक्षित रहा.आपल्या बरोबरच परिवाराचीदेखील काळजी घ्या

Wednesday, 21 July 2021

शासन निर्णय कसा शोधावा

 कोणताही शासननिर्णय ( GR ) कसा शोधावा  "


नमस्कार शिक्षकमित्रहो  ,
                 शासननिर्णय शोधणे  सोपे आहे  .आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जावून कोणताही शासननिर्णय GR लगेच  शोधु शकतो .पण त्याच्यासाठी काही तंत्र व क्लुप्त्या ,संदर्भ  चा व तसेच कही  माहिती चा वापर करावा लागतो .माझ्या माहिती प्रमाणे आपण जर 4 ते 5 पायरी चा  वापर केला तर आपण कोणताही नवा जुना ,कधीचाही कोणताही  GR .लगेच शोधु शकतो.


महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरून शासननिर्णय कसा शोधावा .या संदर्भातील काही तंत्र व पायऱ्या   खालीलप्रमाणे .

१ प्रथम महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर म्हणजेच www.maharashtra.gov.in वर जावा .

२ या वेबसाईट च्या होमपेज वर आपल्याला शासननिर्णय हे बटन किंवा TAB दिसते .

३ शासननिर्णय बटनावर क्लिक केल्यावर शासननिर्णयाचे  पेज ओपन होते .
यावर आपल्याला खालील बाजूला GR दिसतात व वर इतर मेनू दिसतात . प्रत्येक GR च्या डाउनलोड TAB  ला क्लिक करून आपण GR डाउनलोड करू शकतो .

शासननिर्णय पेज वरील मेनुंची ओळख  :

  •  विभाग -   विभाग सिलेक्ट करून विभागानिहाय GR  शोधू शकतो. यामध्ये शासनाचे सर्व विभाग दाखवलेले आहेत .
  • महत्वाचा शब्द -    यामध्ये शोधायच्या GR  मधील महत्वाचा शब्द टाकून ' शोधा ' या बटनावर क्लिक करून GR शोधू शकतो .
  • दिनांकापासून / दिनांकापर्यंत - यामध्ये आपण ज्या दिवशीचा GR शोधायचा आहे, ती दिनांक टाकून  " शोधा " या बटनावर क्लिक  करा म्हणजे आपल्यासमोर त्या दिवशीचा GR ओपन होईल . 
  • सांकेतांक -GR चा सांकेतांक टाकून आपण जो हवा तो GR मिळवू शकतो . 
GR शोधत असताना आपल्याला शोधा या बटनावर क्लिक मारावी लागते . शोधून पुन्हा पहिल्या पेजवर येण्यासाठी पुनर्स्थापित या बटनावर क्लिक करावी .

धन्यवाद

No comments:

Post a Comment

सेतू अभ्यास

  सेतू अभ्यास (इयत्तनिहाय ) इयत्ता निहाय सेतू अभ्यासासाठी खालील नावावर क्लीक करा   Download