माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.आपणांस विविध शैक्षणिक माहिती देण्याचा माझा प्रयत्न आपणांस नक्की आवडेल. आपल्या प्रतिक्रिया नक्की दया...धन्यवाद.. कोरोनावर मात करूया.घरी रहा सुरक्षित रहा.आपल्या बरोबरच परिवाराचीदेखील काळजी घ्या

Thursday, 22 July 2021

सेतू अभ्यास

 सेतू अभ्यास (इयत्तनिहाय)

इयत्ता निहाय सेतू अभ्यासासाठी खालील नावावर क्लीक करा

 Download 

Wednesday, 21 July 2021

ISO मानांकनसाठी निकष

 शाळेला ISO मानांकनसाठीचे निकष

��आपल्या जिल्हा परिषद शाळा आई एस ओ (ISO)
करण्यासाठी खालील निकष आहेत .
=====================
��������������
��आई एस ओ निकष��
♻जुने रेकॉर्ड मांडणी
♻विजिटर नोंदवही
♻विद्यार्थी फ़ाइल्स
♻शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
♻वृक्षारोपण टेबल क्लॉथ
♻घोषवाक्य फ्लावर पॉट
♻ग्रामस्थांचा सहभाग
♻शाळेचे नाव ठळक दर्शवणे
♻सेंद्रिय / गांडूळ खत
♻चप्पल स्टैंड
♻अधिकारी पदाधिकारी फलक
♻समित्या फलक
♻वर्गांना कार्यालयांना फलक
♻सन्देश,सुविचार
♻खिडक्यांना पडदे
♻स्वच्छता व् टापटिपपणा
♻आपात कालीन मार्ग
♻शिक्षक , विद्यार्थी ओळख पत्र
♻दिशादर्शक फलक
♻बोलका वरांडा
♻आखलेले शालेय क्रिडांगण
♻सौरऊर्जा वापर
♻वीज , इन्व्हर्टर सुविधा
♻प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फैन प्रत्येक वर्गात
♻क्रीडासाहित्य मांडणी
♻कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
♻विज्ञान प्रयोगशाळा
♻पार्किंग व्यवस्था
♻विजबचत , पाणिबचत सन्देश
♻स्वच्छता सन्देश
♻पाण्याची सुविधा
♻स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
♻प्रथमोपचार पेटी
♻ऑफिस अंतर्गत रचना
♻शालेय रेकॉर्ड(बॉक्सफाइल नावाच्या स्टिकर
सह)
♻राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो
♻संगणक शिक्षण,e लर्निंग
♻डिजिटल क्लासरूम
♻बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका
♻स्वागत फलक
♻शौचालय सुविधा फलक
♻अग्निशामक यंत्र
♻वाचनालय
♻संरक्षक भिंत
♻शिक्षक कार्यसुचि
♻सुचना व् कौतुक पेटी
♻आपणाला सुचत असलेले आणखी काही
हस्तलिखित
वर्ग सुशोभन
प्रकट वाचन
अध्ययन कोपरे
वाढदिवस शुभेच्छा
व्यक्तिमत्व विकास
कौतुक समारंभ
अल्पबचत बँक
शैक्षणिक सहली
क्षेत्रभेट
ग्रंथालय वापर
शैक्षणिक निर्मिती
शालेय स्वच्छता
फिरते वाचनालय
तरंग वाचनालय
बालसभा
बाल आनंद मेळावा
विशेष वर्ग आयोजन
एक दिवस शाळेसाठी
जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
दिनांकाचा पाढा
चावडी वाचन
प्रयोग शाळा वापर
आरोग्य तपासणी
हळदी कुंकू
संगणक शिक्षण
गीतमंच
हस्ताक्षर सुधार
स्वच्छ ,सुंदर शाळा
इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
शालेय बाग
वृक्षारोपण
शालेय उपस्थिती सुधारणा
टाकाऊ पासून टिकाऊ
सामुदायिक कवायत
मनोरे
योगासने
बोलक्या भिंती
आनंददायी फलक
ई -लर्निंग
विविध स्पर्धा
क्रीडा स्पर्धा
हस्ताक्षर स्पर्धा
पाठांतर स्पर्धा
नृत्य -नाट्य स्पर्धा
रांगोळी स्पर्धा
वक्तृव स्पर्धा
निबंध स्पर्धा
स्मरणशक्ती स्पर्धा
प्रश्न मंजुषा

विद्यार्थी लाभाच्या योजना

 विद्यार्थी लाभाच्या योजना खालीलप्रमाणे


||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
📖 विद्यार्थी लाभाच्या योजना 📖 
======================
👉 उपस्थिती भत्ता
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली
======================
👉 मोफत गणवेश योजना
ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
======================
👉 मोफत लेखन साहित्य
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
======================
👉 शालेय पोषण आहार
ई . १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज
======================
👉 राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना ई . ६वी ते ८ वी ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज
======================
👉 मोफत पाठ्यपुस्तके
ई . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
======================
👉 मोफत गणवेश योजना
ई . १ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
======================
👉 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
======================
👉 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली
======================
👉 माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती ई. ५वी ते १० वी SC,VJNT.SBC मुले व मुली
======================
👉 परीक्षा फी ई. १० वी 
(एस . एस . सी . बोर्ड ) ई. १० वी SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली
======================
👉 अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती ई. १ली ते १० वी
१) जातीचे बंधन नाही
२)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र
३)खालील व्यवसाय असावेत .
जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .
======================
👉 अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
ई. १ली ते १० वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी
अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
======================
👉 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
११वी एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली
======================
👉 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी
१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली
======================
👉 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
५ वी ते ७ वी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
======================
👉 मोफत गणवेश योजना १ली ते ४ थी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
======================
👉 PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ई. १ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी
१)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक
२) उत्पन्न १ लाखांपर्यंत
३)साक्षांकीत फोटो
४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र
५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
================
👉 सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली
२)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र
३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .
================
🙏🙏 धन्यवाद🙏🙏 

कवी व साहित्यिक टोपण नावे

 ¶ कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे साहित्य ¶¶

——– ——– ——– ——– ——–
१)यशवंत दिनकर पेंढारकर
—— यशवंत
२)मोरोपंत रामचंद्र पराडकर
——– मोरोपंत
३)नारायण सूर्याजीपंत ठोसर
——– रामदास
४)दत्तात्रय कोंडो घाटे
——– दत्त
५)चिंतामण त्र्यंबक खानोलकर
———आरती प्रभू
६)नारायण मुरलीधर गुप्त
——– बी
७)गोपाल हरी देशमुख
——– लोकहितवादी
८)शंकर काशिनाथ गर्गे
——– दिवाकर
९)माधव त्रंबक पटवर्धन
——– माधव जुलियन
१०)दिनकर गंगाधर केळकर
——–अज्ञातवासी
११)आम्ताराम रावजी देशपांडे
——– अनिल
१२)कृष्णाजी केशव दामले
——– केशवसुत
१३)सौदागर नागनाथ गोरे
——– छोटा गंधर्व
१४)रघुनाथ चंदावरकर
——– रघुनाथ पंडित
१५)हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
——– कुंजविहारी
१६)दासोपंत दिगंबर देशपांडे
——– दासोपंत
१७)सेतू माधवराव पगडी
——– कृष्णकुमार
१८)नारायण वामन टिळक
——– रेव्हरंड टिळक
१९)माणिक शंकर गोडघाटे
——– ग्रेस
२०)वसंत ना. मंगळवेढेकर
——– राजा मंगळवेढेकर
——– ——– ——– ——–
२१)कृष्ण शास्त्री चिपळूणकर
——– मराठीचे जॉन्सन
२२)केशवसुत-आधुनिक मराठी काव्याचे
——– कवितेचे जनक
२३)बा.सी. मर्ढेकर
——– -मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
२४)सावित्रीबाई फुले
——– आधुनिक मराठी कवितेच्या जननी
२५)संत सोयराबाई
——– पहिली दलित संत कवयित्री
२६)त्रंबक बापुजी ठोंबरे
——– बालकवी
२७)ना.धो.महानोर
——– रानकवी
२८)यशवंत दिनकर पेंढारकर
——– महाराष्ट्र कवी
२९)ना. चि. केळकर
——– साहित्यसम्राट
३०)न. वा. केळकर
——– मुलाफुलाचे कवीशिक्षक पात्रता परीक्षा उत्तरतालिकाउपलब्ध
३१)ग. त्र.माडखोलकर
——– राजकीय कादंबरीकार
३२)शाहीर राम जोशी
——– शाहिरांचा शाहीर
३३)दादोबा पांडुरंग तर्खडकर
——– मराठी भाषेचे पाणिनी
३४)वि.वा. शिरवाडकर
——– कुसुमाग्रज
३५)राम गणेश गडकरी
——– गोविंदाग्रज/बाळकराम
३६)प्रल्हाद केशव अत्रे
——– केशवकुमार
३७)काशिनाथ हरी मोदक
——– माधवानुज
३८)विनायक जनार्दन करंदीकर
——– विनायक
३९)विष्णुशास्त्री चिपळूणकर

——– मराठी भाषेचे शिवाजी
——– ——– ——– ——– ——–
¶¶ काव्य ग्रंथ व कवी ¶¶
——– ——– ——– ——– ——–
१) यथार्थदीपिका – वामन पंडित
२)बिजली- वसंत बापट
३) दासबोध व मनाचे श्लोक -समर्थ रामदास
४)शिळ- ना. घ. देशपांडे
५)गीतरामायण- ग. दि. माडगुळकर
६)ज्वाला आणि फुले- बाबा आमटे.
७)स्वेदगंगा- वि.दा करंदीकर
८)भावार्थदीपिका-संत ज्ञानेश्वर
९)केकावली-मोरोपंत
१०)नलदमयंती स्वयंवराख्यान – रघुनाथ पंडित
११)अभंगगाथा- संत तुकाराम
१२)भावार्थ रामायण-संत एकनाथ
१३)महाभारत-व्यासमुनी
१४)गीता- व्यासमुनी
१५)मुद्राराक्षस- विशाखादत्त
१६)मृच्छकटिका- शूद्रक

योगासन फायदे

 योगाचे फायदे

योगाचे १० सर्वात महत्वाचे फायदे.

वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, उत्तम आरोग्य, यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योगा समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतू प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्र्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्र्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.
योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात १० महत्वाचे फायदे आता आपण बघणार आहोत.

१. सर्व स्तरांवर तंदुरुस्ती. नुसती शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वस्थ राहिलं पाहिजे. श्री श्री रविशंकर जी नेहमी म्हणतात “फक्तं रोग विरहीत शरीर असन्याला स्वास्थ्य महता येणार नाही, तर आनंद, प्रेम आणि उत्साह हे तुमच्या जीवनात उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असतील तर त्याला खरी आरोग्य संपन्नता म्हणता येईल”.
या ठिकाणी योगाच तुमच्या मदतीला धावून येतो. त्यासाठी आसने, प्राणायाम (श्र्वासोच्छ्वासाच्या लयी) आणि ध्यान धारणा या गोष्टी आरोग्य उत्तम राखायला आपल्याला उपयोगी पडतात.
योगा – माझे वैयक्तिक स्तरावर आरोग्य राखण्याचा मंत्र
माझे वजन कमी करण्याचे सूत्र
माझे मन शांत करण्याचा उपाय
माझे उत्तम प्रकारे संवाद साधण्याचे हत्यार
माझे क्रियाशीलता वाढविणारे यंत्र
माझे शंकांचे निरसन करणारे साधन
माझे वेळेची आखणी करणारे उपकरण.

२. वजनात घट. याहून तुम्हाला अधिक काय पाहिजे ! योगाचा फायदा इथे सुद्धा होतो. सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते योगाच्या सहाय्याने वजन कमी करा. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची जाणीव आपल्याला होते. योग्य आहार घेतल्याने सुद्धा वजन नियंत्रणात रहायला मदत होते.

३. ताण तणावा पासून मुक्ती. रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणार्‍या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा रोज केलेला सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातली विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर टाकली जातात.

४. अंर्तयामी शांतता. आपल्या सगळ्यांनाच एखाद्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडते. परंतू आपल्याला हवी असणारी शांती ही आपल्यामध्येच वसलेली आहे हे फार थोड्या लोकांना माहित असेल, फक्त या शांतीची अनुभूती घेण्यासाठी रोजच्या धकाधकीच्या कार्यक्रमातून थोडा वेळ काढायला हवा. या छोट्याशा सुट्टीत रोज योग आणि ध्यान केल्याने त्याचे बरेच फायदे आपल्याला मिळतात. अस्वस्थ झालेल्या मनाला काबूत आणण्यासाठी योगा सारखा दुसरा उपाय नाही.

५. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ. शरीर, मन आणि आत्मा या तिघांचे मिळून एकसंघ अशी आपली यंत्रणा असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात तसेच मानसिक अस्वस्थपणाचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात. योगामुळे निरनिराळ्या अवयवांचे मर्दन केले जाते आणि त्यांचे स्नायू बळकट होतात. श्र्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रामुळे आणि ध्यान धारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

६. सजगतेत वाढ होते. मन हे सतत कुठल्या ना कुठल्या क्रियेत गुंतलेले असते. ते सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यात झोके घेत असते पण वर्तमान काळात मात्र ते कधीच राहत नाही. आपल्यातली सजगता वाढल्याने मनाचे हे लक्षण आपल्या सहज लक्षात येते; आणि त्यावर वेळीच उपाय योजून आपण ताण तणावातून मुक्त होऊ शकतो; आणि मनाला शांत करू शकतो. योगा आणि प्राणायाम यांच्या मदतीने आपल्यातली सजगता वाढते. सजगता वाढल्याने इकडे तिकडे पळणार्‍या मनाला आपण परत वर्तमान क्षणात आणू शकतो. तसे केल्याने ते आनंदी आणि एकाग्र बनते.

७. नाते संबंधात सुधारणा. तुमचा जोडीदार, आई वडील, मित्र किंवा तुमच्या लाडक्या व्यक्ती या सगळ्यांशी असेलेले नातेसंबंध योगामुळे सुधारतात . तणावमुक्त, आनंदी आणि समाधानी मन नात्यां सारख्या संवेदनशील संबंधात फार उपयोगी पडते. योगा आणि ध्यान धारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.

८. उर्जा शक्ती वाढते. दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे शेवटी तुम्हाला गलठून गेल्यासारखे वाटते कां? सतत दिवसभर काम करत राहिल्याने तुम्ही पार थकून जाता. तुमच्यात काही त्राण उरत नाही. परंतू रोज काही मिनिटे नियमित योगाचा सराव केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता. दिवसभराच्या कामाच्या धबडग्यातून तुम्ही मध्येच १० मिनिटांचा वेळ काढून मार्गदर्शित ध्यान जरी केलेत तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्यात परत उत्साह संचारेल आणि हातात घेतलेले काम तुम्ही तत्परतेने पुरे कराल.

९. शरीरातल्या लवचिकपणात आणि शरीराची ठेवण सुधारते. तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना, चालताना त्यात एक प्रकारचा डौल येईल. चुकीच्या पद्धतीने बसण्या उठण्या मुळे पूर्वी जे अंग दुखायचे तसे ते दुखणार नाही.

१०. अंतर्ज्ञानात वाढ. तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योगा आणि ध्यान धारणा या मध्ये आहे. तशी ती झाल्यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता. योगा केल्यामुळे हे बदल आपोआप होत असतात तुम्हाला फक्त याची अनुभूती घ्यायची असते.
एक लक्षात ठेवा, योगा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिचा सराव सतत करत रहा !
योगाच्या सरावामुळे शरीर आणि मन जरी कणखर बनत असले तरी औषधांना तो पर्याय नाही. (जरूर तेव्हा औषधे ही घेतलीच पाहिजेत).

सेतू अभ्यास

  सेतू अभ्यास (इयत्तनिहाय ) इयत्ता निहाय सेतू अभ्यासासाठी खालील नावावर क्लीक करा   Download